कापलेल्या रूळाचे वेल्डींगच नाही केले; रेल्वेला अपघात

उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक असे की, रूळ कापल्यावर तो वेल्डींग न करताच अर्धवट सोडल्याचा संतापजनक प्रकार पूढे आला आहे. दोषींवर कडक करावाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Updated: Aug 20, 2017, 04:22 PM IST
कापलेल्या रूळाचे वेल्डींगच नाही केले; रेल्वेला अपघात title=

नवी दिल्ली : उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक असे की, रूळ कापल्यावर तो वेल्डींग न करताच अर्धवट सोडल्याचा संतापजनक प्रकार पूढे आला आहे. दोषींवर कडक करावाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, उत्कल एक्सप्रेस दुर्घटनेत अज्ञात लोकांवर आयपीसी कलम ३०४ (अ) अन्वये (निष्काळजीपणामुळे मत्यू) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे ट्रॅफीक रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगिले की, हा अपघात दुर्देवी आहे. या दुर्घटनेत २० लोकांचा मृत्यू तर, ९२ जखमी झाले आहेत. पूढे बोलताना जमशेद यांनी म्हटले आहे की, दोशींवर कारवाई तर केली जाईलच. परंतु, रेल्वे आयुक्तांद्वारा याचाही शोध घेतला जाईल की, संबंधीत मंडळींनी योग्य त्या सूचनां आणि आदेशांचे, नियमांचे पालन केले होते किंवा नाही.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांनुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचा काही भाग कापला गेला होता. तसेच, हा भाग वेल्डींग न करताच सोडून दिला गेला होता. वेल्डींग न केलेल्या या भागामुळेच हा अपघात झाल्याचा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतच्या काही ऑडीओ क्लिप्सही व्हायरल झाल्याची चर्चा आहे.