मुंबई : बँकेसंदर्भातील सर्व अपडेट्स ग्राहकांपर्यंत थेट पोहोचावेत आणि ग्राहकांच्या तक्रारींच किंवा त्यांच्या अडचणींचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी PNB ने एक नवी सुविधा सुरु केली आहे, ज्यामुळे बँकेच्या संबंधीत ग्राहकांच्या सर्व शंकांचं निराकरण केलं जाऊ शकतं.
पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) सोमवारी म्हणजे 3 ऑक्टोबरला पीएनबी बँकेच्या खातेदारांसाठी आणि खातेदार नसलेल्यांसाठी व्हाट्सअपची सेवा सुरु केली आहे असं सांगण्यात आलं आहे. PNB बँकेची व्हाट्सअॅप बँकिंग सेवा (Whatsapp Banking Service) सुरु करण्यासाठी PNB च्या '919264092640' या व्हाट्सअॅप नंबरवर 'Hi/Hello' असा मेसेज पाठवावा.
पीएनबी बँकेने असं देखील सांगितलं आहे की, मेसेज करण्याआधी व्हाट्सअॅपवर PNB नावासोबतच ग्रीन टिक आहे की नाही याची पडताळणी करा. जेणेकरुन ते अकाउंट PNB बँकेचं अधिकृत अकाउंट आहे की नाही याची खात्री होईल.
पंजाब नॅशनल बँकेने सुरु केलेल्या व्हाट्सअॅप बँकिंग सेवेद्वारे खातेदारांना बॅलेंस इन्वायरी, शेवटचे 5 ट्रान्जेक्शन्स, स्टॉप चेक, चेक बुक रिक्वेस्ट यांसारख्या नॉन-फायनांशिअल सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच, जे नॉन-अकाऊंट होल्डर्स आणि अकाउंट होल्डर्स या दोघांनाही मिळतील अशा सेवांमध्ये ऑनलाईन अकाऊंट बवनने, बँकेत जमा/ लोन प्रोडक्ट, डिडिटल प्रोडक्ट, एनआरआय(NRI) सेवा, ब्रांच/ATM च्या पत्त्याची माहिती मिळवणे, ऑप्ट-इन आणि ऑप्ट-आउट यांचा समावेश होतो.
पंजाब नॅशनल बँकेची (Punjab National Bank) ही व्हाट्सअॅप बैकिंग सेवा 24x7, सुट्यांसोबतच अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे.