'ही' Bank खात्यात जमा करणार 50,000 रुपये; जाणून घ्या काय आहे 'ही' योजना

शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज (Application)  कसा करू शकता हे सविस्तर जाणून घ्या... (punjab national bank offer for farmers pnb kisan tatkal loan yojana )

Updated: Sep 19, 2022, 04:28 PM IST
'ही' Bank खात्यात जमा करणार 50,000 रुपये; जाणून घ्या काय आहे 'ही' योजना title=

PNB Kisan Scheme: पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज (Application)  कसा करू शकता हे सविस्तर जाणून घ्या... (punjab national bank offer for farmers pnb kisan tatkal loan yojana )

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील
पंजाब नॅशनल बँककडून पीएनबी (PNB) किसान तत्काळ कर्ज योजनेची सुविधा ग्राहकांना पुरवत आहे. ज्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. याबाबात पीएनबीने ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. 

पीएनबीने केले ट्विट 
पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएनबीने किसान तत्काळ कर्ज योजना (Kisan tatkal Loan yojana) आणली आहे.

- 50,000 च्या कमाल कर्जासह विद्यमान मर्यादेच्या 25%
- कर्ज सुरक्षिततेची हमी न देता
- किमान कागदपत्रे आवश्यक असतील

कोणत्याही कामासाठी कर्ज घेता येते
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सांगितले आहे की, या योजनेअंतर्गत तुम्हाला शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी पैशांची गरज आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. किसान तत्काळ कर्ज योजना प्रत्येक आर्थिक मदतीसाठी वापरता येणार आहे. 

कोणत्या लोकांना मिळणार फायदा?
PNB तत्काळ कर्ज (Loan) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कृषी क्षेत्रात (agriculture sector) काम करणारे शेतकरी किंवा शेतजमिनीचे भाडेकरू असणे आवश्यक आहे. अशा रीतीने कर्जदाराला कृषीतज्ञ असणे बंधनकारक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी त्यांच्याकडे मागील दोन वर्षांचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

वाचा : दागिने चोरीला गेल्यास आता घाबरू नका; 'या' योजनेतून मिळेतील पूर्ण पैसे

सेवा शुल्क भरावे लागणार नाही
बँकेच्या अधिसूचनेनुसार, शेतकर्‍यांना किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्या विद्यमान कर्ज (Existing debt) मर्यादेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाईल. कमाल मर्यादा 50,000 रुपये आहे. हे कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांना कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही.

कर्जाची परतफेड 5 वर्षांत करता येते
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी दिला जाईल. या कर्जाचे हप्तेही सोपे ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना परतफेड करताना कोणतीही अडचण येऊ नये.

ऑनलाइन आणि ऑफलाइन कर्ज कसे घ्यावे
कर्ज घेण्यासाठी शेतकरी पीएनबीच्या (PNB) शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. येथे तुम्ही फॉर्म मागवून कर्जासाठी अर्ज करू शकता. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.