Driving Tips: रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा का आखतात? जाणून घ्या त्यामागचा अर्थ

अपघाताच्या घटना होऊ नये यासाठी नियमांनुसार रस्त्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रेषा आखल्या जातात. यामुळे गाडी चालवताना (Drive Car) मदत होते. पण अनेकांना या रेषांचा नेमका अर्थ माहित नसतो.

Updated: Sep 19, 2022, 04:11 PM IST
Driving Tips: रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा का आखतात? जाणून घ्या त्यामागचा अर्थ title=

Driving Road Safety Rules: देशात दरवर्षी हजारो लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अपघातांचं (Road Accident) प्रमाण केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने (Central Road Ministry) नियमांची कठोर अमलबजावणी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गातील रस्त्यांचं चौपदरीकरणही जोरात सुरु आहे. अपघाताच्या घटना होऊ नये यासाठी नियमांनुसार रस्त्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रेषा आखल्या जातात. यामुळे गाडी चालवताना (Drive Car) मदत होते. पण अनेकांना या रेषांचा नेमका अर्थ माहित नसतो. चला तर मग या रेषांचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊयात

रस्त्यावर एक लांबलचक पांढरी रेषा (Single White Line On Road) आखली असते. याचा अर्थ आपल्याच लेनमधून जावे लागते. अशा ठिकाणी तुम्ही लेन बदलू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशी चूक करणं महागात पडू शकतं. रस्त्याच्या मधोमध दुहेरी पांढरी रेषा (Double White Line On Road)  म्हणजे दोन्ही बाजूंनी वाहने इथे येऊ शकतात, त्यामुळे स्वत:च्या बाजूने चालावे लागते. रस्त्याच्या मधोमध एक पांढरी तुटक रेषा (White Dashed Line On Road) आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही लेन बदलण्याचा प्रयत्नात असाल बदलू शकता. पण लेन बदलण्यापूर्वी तुम्हाला मागून येणारी कार किंवा इतर वाहन दिसले पाहिजे आणि ते गेल्यानंतरच तुम्ही इंडिकेटर देऊन लेन बदलू शकता.

बाइकच्या Disc ब्रेकला छिद्र का असतात? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

रस्त्याच्या मधोमध लांब पिवळी रेषा (Single Yellow Line On Road)  आखलेली असते. लांब पिवळी रेषा असलेल्या रस्त्यावर इतर कोणतेही वाहन ओव्हरटेक केले जाऊ शकते, परंतु पिवळी रेषा ओलांडण्यास मनाई आहे. अनेक राज्यांमध्ये त्याचे वेगवेगळे अर्थही असू शकतात. तेलंगणाप्रमाणे या रेषेचा अर्थ राज्यात वाहन ओव्हरटेक करता येत नाही. दुहेरी लांब पिवळी रेषा (Double Yellow Line On Road)  रस्त्याला दोन भागात विभागते. म्हणजे एकाच लेनमधून जाणारी वाहने या मार्गिका ओलांडू शकत नाहीत. या रेषेवरून वाहन चालवणे किंवा ओलांडणे चुकीचे आहे.