देशात आपात्कालीन लसीकरण करु द्या; Serum ची केंद्राकडे मागणी

केंद्राच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष... 

Updated: Dec 7, 2020, 09:10 AM IST
देशात आपात्कालीन लसीकरण करु द्या; Serum ची केंद्राकडे मागणी  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : पुणे स्थित सिरम Serum Institute of India या संस्थेनं ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या Coronavirus कोरोना लसीच्या आपात्कालीन लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला covishield कोविशील्ड ही लस क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता या लसीचे  आतापर्यंत 4 कोटींच्या आसपास डोस तयार करण्यात आले आहेत. 

कोरोना महामारीमुळं निर्माण झालेली वैद्यकिय गरज आणि  जनहितासाठी लसीकरण करण्यात येण्यासंबंधीची कारण सिरमकडून करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आल्याचं कळत आहे. कोरोना लसीच्या शर्यतीत असणारी आणि केंद्राकडे परवानगी मागणारी ही पहिलीच भारती कंपनी ठरली आहे. 

देशातील विविध भागांसोबतच Oxford-AstraZeneca  कडून युके आणि ब्राझील येथेही या लसीची चाचणी घेण्यात य़ेत आहे. मागच्याच आठवड्यात या लसीची चाचणी देशात कोणत्याही परिस्थिथीत थांबवण्यात येणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. चेन्नईतील एका स्वयंसेवकानं या लसीच्या परिणामांबाबत अजव दावा केल्यानंतर त्याबद्दल काही अंशी साशंकतेचं वातावरण तयार झालं. पण, हे वातावरण स्पष्ट करत लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचाच निष्कर्ष समोर आला. तेव्हा आता केंद्राकडून अधिकृत परनावगी मिळाल्यास देशात येत्या काळात लवकरच कोरोना लसीच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याचं चित्र आहे. 

 

दरम्यान, भारतात vaccination लसीकरणासाठी परवानगी मागणारी सिरम ही दुसरी संस्था ठरत आहे. यापूर्वी अमेरिकन कंपनी फायझरने केंद्राकडे देशात लसीकरणासाठी परवानगी मागितली होती. या लसीचा सक्सेस रेट 95 टक्के असल्याचं सांगितलं होतं. ज्यामुळं लस घेणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायझरच्या लसीचे 2 डोस आवश्यक असून तिची किंमत 3 हजार रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.