जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना 'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार

नवी दिल्ली इथं पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभ पार पडला. या समारंभात पब्लिक रिलेशन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. 

Updated: Sep 25, 2023, 08:09 PM IST
जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना 'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार  title=

नवी दिल्ली : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे  जनसंपर्क अधिकारी निखिल मुकुंद वाघ यांना नवी दिल्ली इथं  'प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चाणक्य पुरस्कार समारंभात संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार जुआल ओरम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी  पर्यटन विभागाचे माजी सचिव  विनोद झुत्शी ,   पीआरसीआयचे मुख्य मार्गदर्शक जयराम, पीआरसी आयच्या राष्ट्रीय अध्यक्ष गीता शंकर तसंच मोठ्या संख्येने पीआर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मीडिया व्यावसायिक यांची  उपस्थिती होती. 

निखिल वाघ हे मुळचे बार्शीचे असून प्रारंभिक शिक्षण सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. पुढे छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास कम्युनिकेशन पूर्ण केले. 

 निखिल वाघ यांनी 2011 मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) चे PRO- जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी त्यांना लोकमत आणि ABP माझा सारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय माध्यम समुहांमध्ये विविध पदांवर 07 वर्षांचा अनुभव आहे. अशाप्रकारे, त्यांच्याकडे 19 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी GSLच्या पीआर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.