गोपनियता मुलभूत अधिकार आहे का? यावर आज निकाल

गोपनियता म्हणजेच प्रायवसी मुलभूत अधिकार आहे की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ३ आठवड्यांच्या सुनावणी नंतर २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला होता. चीफ जस्टिस जे.एस खेहर यांच्या अध्यक्षतेत ९ न्यायाधिशांच्या बेंचने यावर सुनावणी केली होती.

Updated: Aug 24, 2017, 09:10 AM IST
गोपनियता मुलभूत अधिकार आहे का? यावर आज निकाल title=

नवी दिल्ली : गोपनियता म्हणजेच प्रायवसी मुलभूत अधिकार आहे की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ३ आठवड्यांच्या सुनावणी नंतर २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला होता. चीफ जस्टिस जे.एस खेहर यांच्या अध्यक्षतेत ९ न्यायाधिशांच्या बेंचने यावर सुनावणी केली होती.

राइट टू प्रायवसीचा मुद्दा तेव्हा उठला जेव्हा सोशल वेलफेयर स्कीमचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार अनिवार्य केलं. यानंतर या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली. 

या याचिकेमध्ये आधार स्कीमच्या कॉन्स्टिट्यूशनल वॅलिडिटीला असं आव्हान देण्यात आलं आहे की, हे गोपनियतेच्या मुलभूत हक्क्याच्या विरोधात आहे. त्यामुळे आता यावर आज काय निकाल येतो यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.