नवी दिल्ली : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी खळखळून हसवतात तर कधी डोळ्यात अंजन घालून जातात. कधी भावुक करतात आणि मदत करण्याचं आवाहन करणारे असतात.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भावुक करणारा आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की गरोदर पत्नीसाठी पती भररस्त्यात गाडी समोर गुडघ्यावर बसून मदतीसाठी याचना करताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता पती-पत्नी रस्ताने जात आहेत. पत्नी गर्भवती आहे तिला भररस्त्यात अचानक वेदना होऊ लागतात. महिलेला वेदना होत होत्या. पत्नीच्या वेदना पाहून पतीलाही काही सुचत नव्हतं. तो लवकर मदत मिळावी म्हणून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे मदत मागत होता.
मात्र काही वेळ गाड्या थांबत नव्हत्या. नवरा हात जोडून गुडघे टेकून खाली बसून शक्य तेवढ्या सगळ्या पद्धतीनं मदत मागण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळानंतर एक गाडी मदतीसाठी थांबली.
या गाडीमधून पत्नीला घेऊन रुग्णालयात जातात. मदत मिळण्यासाठी पतीला अनेकांच्या हातापाया पडण्याची वेळ येते. मात्र त्यावेळी एक माणूस देवासारखा धावून येतो. ज्यामुळे पत्नीला वेळेत मदत मिळू शकली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे ते मात्र अजून समजू शकलं नाही.