काय सांगता! 2 दिवसांसाठी देशभरात बत्ती गुल; जाणून घ्या कारण

देशभरातील वीज वितरण कर्मचारी पुढील काही आठवड्यात 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाणार आहेत. यामुळे देशभरात वीज गायब होण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 24, 2022, 11:02 AM IST
काय सांगता! 2 दिवसांसाठी देशभरात बत्ती गुल; जाणून घ्या कारण title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या (NCCOEEE) बुधवारी झालेल्या बैठकीत या देशव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन दिवसांत देशभरात विजेची समस्या निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

वीज कर्मचाऱ्यांसोबत देशभरातील अनेक कर्मचारी संघटना दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया पावर इंजिनियर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दूबे यांनी म्हटले की, सर्व राज्यांचे वीज कर्मचारीसुद्धा केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात संपात सहभागी होणार आहे. 

जाणून घ्या कोणत्या आहेत मागण्या?

शैलेंद्र दूबे यांनी म्हटलं की, खासगीकरणाच्या धोरणांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. वीज कर्मचारी आणि इंजिनियर्स यांची प्रमुख मागणी आहे की, वीज सुधारणा विधेयक 2021 मागे घेण्यात यावे. आणि सर्व प्रकारच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला बंद करण्यात यावे. 

बँक कर्मचारी संपावर

खासगीकरणाच्या धोरणाविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी 28-29 मार्चच्या संपात सहभागी होणार आहेत. बँकांच्या कर्मचारी संघटनांनी 28-29 मार्च रोजी संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. सरकारी बँकांचे खासगीकरण आणि बँक अधिनियमन सुधारणा विधेयक 2021 च्या विरोधात बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.