फक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते

या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.

Updated: Apr 26, 2019, 01:06 PM IST
फक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते title=

मुंबई : आतापर्यंत फक्त पोस्ट कार्यालयाचा वापर फक्त पत्रव्यवहारासाठीच केला जात नाही. काळानुसार पोस्टाने आपल्या सुविधांमध्ये देखील बदले केले आहेत. बँकेत किंवा पोस्टात बचत खाते नसणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. अधिका-अधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पोस्टाने नवी योजना आणली आहे. या योजनेमार्फत ग्राहकांना दोन प्रकारची खाते उघडण्याचा पर्याय असणार आहे.

बँकामध्ये अशाप्रकारचे बचत खाते उघडण्यासाठी किमान 500-1000 हजार रुपये द्यावे लागतात. पोस्टात तुम्ही फक्त 20 रुपयांमध्ये बचत खाते उघडू शकता. जे बँकेच्या तुलनेत फारच कमी आहेत. पोस्टाच्या बचत खात्यात तुम्हाला किमान 50 रुपये ठेवणे अनिर्वाय असणार आहे.  

या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत. परंतु यामध्ये मिळणाऱ्या सेवांमध्ये फरक असणार आहे. या पैकी एक खाते उघडण्यासाठी केवळ 20 रुपये द्यावे लागणार आहेत. तर दुसर खाते उघडण्यासाठी 500 रुपये मोजावे लागणार आहे. 500 रुपये देऊन उघडलेल्या खात्यासोबत ग्राहकाला एटीएम आणि चेकद्वारे व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. या खात्यात खातेधारकाला 500 रुपये किमान ठेव म्हणून ठेवावे लागणार आहेत. तसेच चेकची सुविधा असलेल्या खात्यात तुम्हाला किमान 500 रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. हे खाते सुरु ठेवण्यासाठी खातेधारकाला निदान 3 वर्षातून एकदा तरी व्यवहार करणे अनिर्वाय असणार आहे. बँकेत एका ठराविक वेळेनंतर खातं निष्क्रिय केलं जातं.

ही आहेत वैशिष्ट्ये

खातेधारकाला आपल्या खात्यात असलेल्या रकमेनुसार व्याज दिले जाते. पोस्टाच्या बचत खात्यातून मिळणाऱ्या १० हजार रुपयापर्यंतचे व्याज हे करमुक्त असणार आहे. विशेष म्हणजे खातेधारकाला आपल्या सोयीनुसार बचत खाते हे देशाभरातील कोणत्याही पोस्ट कार्यालयात ट्रान्सफर करता येईल.

या आहेत अटी

पोस्टातील बचत खाते उघडण्यासाठी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. तुम्हाला एक अर्ज भरुन द्यावा लागणार आहे. हा अर्ज तुम्हाला भारतीय पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट वरुन ऑनलाईन देखील भरता येईल. तसेच केवायसी (KNOW YOUR customer) चा फॉर्म भरुन द्यावा लागेल.