नवी दिल्ली : स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.
एक्सिस बँकेने व्याजदरामध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ८.३० टक्के झाला आहे. बँकेने ३ वर्षानंतर व्याजदरामध्ये वाढ केली आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि यस बँकेने देखील जानेवारीमध्ये व्याजदरामध्ये वाढ केली आहे.
या बँकांनी एमसीएलआरचा दर ०.०५ टक्क्यांवरुन ०.१० टक्के केला आहे. जानेवारीपासून हे लागू झाले आहेत. यामुळे होम लोन, ऑटो लोनचा ईएमआय वाढणार आहे.
डिपॉजिटवर जास्त पैसा द्यावा लागत असल्यामुळे बँकांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. बँकांनी एप्रिल २०१६ मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग (MCLR) सिस्टम लागू केला आहे. छोट्या कालावधीसाठीच्या लोनमध्ये व्याजदर वाढलेले राहतील.
कोटक महिंद्रा बँकेचं म्हणणं आहे की, 'डिपॉजिट ०.५ टक्क्यांनी वाढली आहे. रिजर्व्ह बँकेने संकेत दिले आहेत की, व्याजदरात आता वाढ किंवा घट नाही होणार. त्यामुळे बँकाचे दर देखील कमी नाही होणार.'