Congress ED Raids: मोदी सरकार (Modi Government) केंद्रात सत्तेत आल्यानंतर गेल्या आठ वर्षात ईडीने (Enforcement Directorate) तब्बल 3 हजार छापे मारले आहेत. ईडीच्या निशाण्यावर केवळ विरोधी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विरोधकांना रोखण्यासाठी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोपही काँग्रेसने (Congress) केला आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) मधल्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी काँग्रेस नेत्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे मारली केली. यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी ईडीची छापेमारी म्हणजे भाजपचा (BJP) प्रतिशोध असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेता पवन खेडा (Pavan Kheda) यांनी दिलेल्या माहितीनुसार 2004 ते 2014 दरम्यान यूपीए सरकार सत्तेवर असताना 112 वेळी ईडीने कारवाई केली. तर 2014 नंतर म्हणजे गेल्या 8 वर्षात ईडीने तब्बल 3010 वेळा कारवाई केली आहे.
ईडीच्या निशाण्यावर विरोधक
गेल्या 8 वर्षात ईडीच्या निशाण्यावर केवळ विरोधक असल्याचा दावा पवन खेडा यांनी केला आहे. 95 टक्के छापे हे केवळ विरोधकांवर टाकण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी करण्यात आली. आत काँग्रेसचं 85 वं अधिवेशन होणार आहे, त्याआधी छत्तीसगढमध्ये छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आता ईडीचा अर्थ इलीमिनेटिंग डेमोक्रसी (लोकतंत्र संपवणं) असा झाला आहे. केंद्र सरकारने ईडीचा अर्थच बदलून टाकला आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.
कोणत्या पक्षावर किती छापे
गेल्या आठ वर्षात ईडीने केलेल्या कारवाईची आकडेवारीच समोर ठेवली आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेसवर सर्वाधिक 24 वेळा, टीएमसी -19, राष्ट्रवादी - 11, शिवसेना - 8, डीएमके - 6, आरजेडी - 5, बीएसपी - 5, पीडीपी - 5, आईएनएलडी - 3, वाईएसआरसीपी- 2, सीपीएम- 2, नॅशनल कॉन्फरेन्स - 2, पीडीपी- 2, एआईएडीएमके- 1, एमएनस - 1 आणि एसबीएसला 1 वेळा ईडी कारवाईचा सामना करावा लागला आहे.
छत्तीसगडमध्ये कोणावर छापे
काँग्रेसने छत्तीसगडमध्ये ज्या नेत्यांवर ईडीची छापेमारी झाली त्या, नेत्यांची नावंही सांगितली. काँग्रेस नेते रामगोपाल अग्रवाल, देवेंद्र यादव, गिरीश देवांगन, आरपी सिंह, विनोद तिवारी आणि सनी अग्रवाल यांच्यावर ईडीची छापेमारी सुरु आहे. आमचं मौन आमची कमजोरी समजू नका असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
याआधी अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाईचे आदेश दिले होते. यात हिमंता बिस्वा सरमा, शुभेंदू अधिकारी, बीएस येडियुरप्पा, रेड्डी बदर्स, नारायण राणे, मुकुल रॉय यासारखे नेत भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना लगेच क्लीन चीट मिळाली. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी पीएम मोदी यांनी ईडी आपलं अस्त्र बनवलं आहे. गेल्या नऊ वर्षात ईडीने काँग्रेस नेत्यांवर सर्वाधिक कारवाई केली आहे. पण काँग्रेस या दबावाला बळी पडणार नाही, पीएम मोदींमध्ये इमानदारी शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या मित्रांच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करावा असं आव्हान काँग्रेसने केलं आहे.