गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे

Updated: Sep 11, 2021, 03:30 PM IST
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत title=

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, पक्षामध्ये वेळोनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. रुपाणी हे गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे गुजरात तसेच दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना 'पक्षामध्ये वेळोनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. गुजरात विधानसभेच्या पुढील वर्षी निवडणूका आहेत. या निवडणूकादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात येतील. असे त्यांनी म्हटले आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.