देशातील 50 टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्यात; NSOच्या अहवालात माहिती समोर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)तर्फे सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये 2019 मध्ये देशातील 50 टक्क्याहून अधिक शेतकरी कुटुंब कर्जात असल्याची बाब समोर आली आहे

Updated: Sep 11, 2021, 02:58 PM IST
देशातील 50 टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्यात; NSOच्या अहवालात माहिती  समोर title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)तर्फे सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये 2019मध्ये देशातील 50 टक्क्याहून अधिक शेतकरी कुटुंब कर्जात असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये सरासरी प्रत्येक कुटुंबावर 74 हजाराचे कर्ज असल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जामधून 69.6 टक्के कर्ज बँका, सहकारी समित्या आणि सरकारी संस्थांमधून घेण्यात आले आहे. तसेच 20.5 टक्के कर्ज नोंदणीकृत सावकारांकडून घेण्यात आले. तसेच एकूण कर्जांमध्ये केवळ 57.5 टक्के कर्ज हे कृषी व त्यासंबधी उद्देशांसाठी घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कृषी वर्ष 2018-19 च्या दरम्यान शेतकरी कुटुंबांचे मासिक सरासरी  उत्पन्न 10218 रुपये होते. उत्पन्नामध्ये मजुरीतून 4063 रुपये, पिक उत्पादनातून 3798 रुपये, पशुपालनातून 1582 रुपये, गैर कृषी व्यवसायातून 641 रुपये आदींचा सामावेश होता.

आकडेवारी

  • देशात शेतकरी कुटुंबांची सख्या 9.3 कोटी होती. 
  • ओबीसी 45.8 टक्के, एससी 15.9 टक्के, एसटी 14.2 टक्के आणि अन्य 24.1 टक्के होते. 
  • 7.93 कोटी कृषी कुटुंब ग्रामीण क्षेत्रात राहतात.
  •  83.5 टक्के ग्रामीण कुटुंबांकडे 1 हेक्टरहून कमी शेतजमीन आहे.
  •  फक्त 0.2 टक्के कुटुंबांकडे 10 हेक्टरहून अधिक जमीन आहे.