महाराष्ट्रानंतर या राज्यात ही बंडखोरीचं चिन्ह, 90 आमदार थेट राजीनामा घेऊन पोहोचले

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पुढे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे.

Updated: Sep 26, 2022, 05:46 PM IST
महाराष्ट्रानंतर या राज्यात ही बंडखोरीचं चिन्ह, 90 आमदार थेट राजीनामा घेऊन पोहोचले title=

मुंबई : फक्त 2 राज्यात असलेले काँग्रेस सरकार देखील संकटात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आपलं हे पद सोडू शकतात असं बोललं जात होतं. पण रविवारी मात्र सगळी समीकरणे बिघडतात. गेहलोत यांचे 90 समर्थक आमदार अचानक प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे राजीनामा सोपवण्यासाठी पोहोचतात. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress) राजस्थानमधील सरकारवर डाव खेळल्याचं बोललं जातं आहे.

गांधी कुटुंबियांचे (Gandhi Family) जवळचे मानले जाणारे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना अध्यक्ष केलं जावू शकतं. अशी चिन्ह होती. पण आता त्यांचं समर्थक याच्याविरोधात जाण्याची शक्यता आहे. गेल्या 2 वर्षात अशोक गेहलोत यांचं वर्चस्व पक्षात वाढलं आहे. सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर देखील हायकमांड गेहलोत यांच्या पाठिशी उभं होतं. त्यामुळे सरकार वाचलं होतं. 

राज्यसभा निवडणुकीत देखील पक्षाने गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यावर विश्वास कायम ठेवला. पण अशोक गेहलोत यांनी पद सोडल्यानंतर ही त्यांच्या विश्वासाचाच माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता कमीच आहे.

गांधी परिवाराला देखील त्यांचा जवळचा व्यक्ती अध्यक्षपदावर हवा आहे. त्यामुळे त्यांच्यावर वंशवादाची होणारी टीका देखील कायमची पुसली जाईल. सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्री केल्यास गेहलोत यांचं समर्थक आमदार विद्रोह करु शकतात याची झलक त्यांनी आधीच दाखवली आहे.

राजस्थानात पर्यवेक्षक म्हणून गेलेले अजय माकन काँग्रेस आमदारांना सांगितले की, काँग्रेस इतिहासात कधीच अटी लावून बदल होत नाहीत. त्यामुळे सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता गेहलोत यांचे समर्थक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.