नवी दिल्ली : नीरव मोदी आणि सहकाऱ्यांनी केलेल्या पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे. उषा अनंतसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना नीरव मोदीचा गैरव्यवहार उजेडात आला होता. सुमारे १४ हजार कोटी रूपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात उषा यांच्यावरही आरोप ठेवण्यात आलेत. व्यवस्थापकीय संचालक या नात्यानं त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, असा ठपका त्यांच्यावर आहे.
तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी अलाहाबाद बँकेच्या एमडी आणि सीईओपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केंद्र सरकारनं केलीय.