नवी दिल्ली: संपूर्ण देशात दिवाळीची धामधूम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली तर दुसरीकडे त्यांची आई घरी पूजा करण्यात व्यस्त होती. यावेळी त्यांनी गुजराती पारंपारीक नृत्यावर ताल धरला. पंतप्रधानांच्या आई गरबा खेळतानाचा व्हिडिओ पॉंडेचरीच्या उप राज्यपाल किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला.
Spirit of Deepavali at tender age of 97. She's mother of @narendramodi (Hiraben Modi -1920) celebrating Diwali at her own hom@SadhguruJV pic.twitter.com/HBXAzNXomC
— Kiran Bedi (@thekiranbedi) October 20, 2017
किरण बेदी म्हणतात, '९७ व्या वर्षात दिवाळीचा उत्साह बघण्यासारखा आहे. या नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन आहेत, ज्या आपल्या घरी दिवाळी साजरी करीत आहेत. मीडियासमोर त्या अनेकदा आल्या आहेत पण गरबा खेळताना त्या पहिल्यांदाच दिसत आहेत.'
आई हिराबेन या पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ आरसीआरला पहिल्यांदाच गेल्या होत्या तेव्हा ही त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. मोदींनी त्यांना आपले निवासस्थान दाखवत चांगला वेळ घालविला. मोदी आणि त्यांच्या आईच्या झालेल्या भेटीचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. मोदींनी लिहिले, माझी आई गुजरातला परतली. ती प्रथमच आर सी आर येथे आल्यावर चांगला वेळ व्यतीत केला.
आपल्या ६७ व्या वाढदिवसाला म्हणजेच १७ सप्टेंबरला पंतप्रधान आईला आशीर्वाद घेण्यासाठी भेटले. हिराबेन साधे जीवन जगत आहेत. गेल्यावेळी नियमत तपासणीसाठी त्या गांधीनगरच्या सरकारी रुग्णालयात रिक्षाने पोहोचल्या होत्या.