पंतप्रधानांकडून पंचकुलाच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंचकुला आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Updated: Aug 25, 2017, 10:16 PM IST
पंतप्रधानांकडून पंचकुलाच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंचकुला आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी उशिरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गृहसचिव राजीव मेरिषी यांच्यासोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थिती लवकरात लवकर सामान्य होण्यासाठी 24 तास काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत.

डेरा सच्चा सौदा या पंथाचा स्वयंघोषित गुरू गुरूमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी CBI कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हरियाणातल्या पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. पंचकुला आणि सिरसामध्ये झालेल्या हिंसेमध्ये 30 जणांचा बळी गेला, तर सुमारे आडीचशे जण जखमी झाले आहेत.