बीदर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पुन्हा एकदा काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केलंयं. यानंतर त्यांच्यावर टीका झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर भाष्य केलं आहे.
काँग्रेस नेत्यांच्या तोंडी असणारी काश्मीरच्या स्वायत्ततेचा आवाज म्हणजे काश्मीरच्या स्वातंत्र्याचे समर्थन आहे. हा प्रकार म्हणजे देशाच्या सैनिकांचा अपमान आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांच्यावर कडाडून हल्ला चढवलाय.
काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या चिदंबरम यांच्या विधानावरुन आता स्वपक्षीयांबरोबरच विरोधकांच्याही टीकेला सामोरे जावं लागतयं.
काँग्रेस नेत्यांची ही विधान म्हणजे केवळ काश्मीर प्रश्नच नाही तर सार्जिकल स्ट्राईक आणि सेनेच्या बहादुरीबद्दल त्यांना काय वाटते याच स्पष्ट चित्र असल्याची थेट टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.
असे वक्तव्य करत चिदंबरम यांनी देशासोबत गद्दारी केलीय. काँग्रेसचा भारत तो़डण्याचा डाव आहे असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी यांच्यापाठोपाठ अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काँग्रेसवर हल्ला चढवलाय. काश्मीर समस्या ही काँग्रेसची देणगी आणि चिदंबरम यांचे विधान म्हणजे देशाच्या सुरक्षेला आव्हान दिल्यासारखे आहे असं अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.