PM Narendra Modi Speech in Loksabha : गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना ईडी ( ED inquiry) चौकशीला सामोरे जावे लागले. भाजप सरकारच्या दबावामुळे ईडी चौकशी होत असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे. अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी थेट संसदेतून जाहीर प्रत्युत्तर दिले पाहिजे. ज्यांची ED चौकशी जाली त्यांनी ED चे आभार मानले पाहिजेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळेच विरोधक एका व्यासपीठावर आले. जे काम जनता करू शकली नाही ते काम ईडीने केले आहे असा टोला पंतप्रधान मोंदी यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींच्या या विधानावरून विरोधकांनी लोकसभेत मोठा गदारोळ घातला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
2004 ते 2014 काँग्रेसच्या काळात देशाची बरबादी झाली. 2014च्या आधीचं दशक 'लॉस्ट डिकेड होतं मात्र 2014 नंतरचं दशक 'इंडिया डिकेड म्हणून ओळखलं जाईल अस म्हणत त्यांनी काँग्रेसला जोरदार टेला लगावला. आपण संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलंय. याउलट घोटाळ्यांमुळे काँग्रेस आणि यूपीएची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे भविष्यात जगभरात काँग्रेसच्या बरबादीचा अभ्यास होऊ शकतं असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यूपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात जेव्हा अणुकरारावर चर्चा होत होती तेव्हा ते हे नोट फॉर व्होटमध्ये गुंतले होते. यावेळी मोदींनी टूजी, कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख केला. घोटाळ्यांमुळे देशाची जगात बदनामी झाली. 2004 ते 2014 या दशकात देशाचे खूप नुकसान झाले. टीका व्हायला हवी पण आरोपात त्यांनी नऊ वर्षे वाया घालवली. निवडणूक हरली तर ईव्हीएमला दोष द्या, भ्रष्टाचाराची चौकशी झाली तर एजन्सींना शिव्या. मात्र, ईडीने या लोकांना एका व्यासपीठावर आणले याबद्दल ईडीचे आभार मानले पाहिजेत. जे काम देशातील मतदार करू शकले नाहीत ते ईडीने केले आहे असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.