'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.

Updated: Feb 8, 2023, 05:02 PM IST
'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर title=

Ramdas Athwale Poem : संसदेत मंगळवारी राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि गौतम अदानी  (Gautam Adani) यांचा जुना फोटो दाखवत, दोघांमध्ये नाते काय असा सवाल उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. यावर भाजपकडून देखील प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते. या तापलेल्या वातावरणात आता रामदास आठवले (Ramdas Athwale)यांनी कविता सादर केली आहे. या त्यांच्या कवितेनंतर संसदेत एकच हशा पिकला होता. 

राज्यसभेत आज चर्चेदरम्यान रामदास आठवले (Ramdas Athwale) यांना बोलण्याची संधी मिळाली होती. यावेळी आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निषाणा साधला. राहूल गांधी यांच्या दाढीवर निषाणा साधत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या या कवितेची संसदेत एकच चर्चा रंगली आहे.  

रामदास आठवलेंची संपुर्ण कविता

राष्ट्रपति जी का अभिभाषण, मजबूत करेगा भारत नेशन,
विरोध करना है कांग्रेस का फैशन, इसलिए मैं विरोध में कर रहा भाषण,
कांग्रेस वालो, जितनी बढ़ानी है उतनी बढ़ाओ दाढ़ी,
लेकिन मोदी जी की है बहुत ही मजबूत बॉडी,
मोदीजी को मालूम है देश के तमाम लोगों की नाड़ी,
फिर कांग्रेस की कैसे चलेगी उनके सामने गाड़ी,
मोदी जी आदमी हैं खास, इसलिए उनके साथ है रामदास,
मोदीजी को है विकास की है आस, इसलिए वो राजनीति में हो गए हैं पास.

कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला. तसेच मोदी यांना जनतेची नाडी माहीतीय, तर कशी चालणार कॉंग्रेसची नाडी, असे देखील कवितेतून टोमणे त्यांनी मारले.

राष्ट्रपतींचे भाषण पॉइंट टू पॉइंट होते. राष्ट्रपती दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याकावर बोलले. मोदी सरकारने सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाने दोनदा पराभव केला होता.त्यांना लोकसभेत प्रवेशाची संधी देण्यात आली नाही. यावर संसदेत शेम शेमच्या घोषणा देण्यात आल्या. 

पंतप्रधान मोदीजींनी बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी केली. व्हीपी सिंह यांनी सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला, असे आठवले (Ramdas Athwale) म्हणाले. तुम्ही माझाही पराभव केला, म्हणूनच मी येथे आलो आहे,असे म्हणताच संसंदेत एकच हास्यकल्लोळ झाला. 'राष्ट्रपतींचे अभिभाषण ही मोदी सरकारची विकासाची गंगा आहे, तुम्ही त्यांच्याशी का पंगा घेताय. मला फक्त आशा आहे की तुम्ही तिथेच राहाल आणि आम्ही इथेच राहू, एवढे बोलून आठवलेंनी आपली कविता संपवली आणि संसदेत एकच हशा पिकला.