नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानपदाच्या दाव्यावर मोदींनी राहुल गांधीवर टीका केली. बंगारपेटमध्ये जाहीर सभेत त्यांनी म्हटलं की, काँग्रेस 6 आजारांनी ग्रासलेली आहे. पक्ष जेथे तेथे तेथे हे 6 आजार व्हायरल प्रमाणे पसरतात. अप्रत्यक्ष रूपाने त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांच्यावर देखील टीका केली.
मोदींनी राहुल गांधी यांचा पंतप्रधानपदाचा दावा अहंकाराचा असल्याचं म्हटलं आहे. पाण्यासाठी लोकांना लाईन लावाली लागते. ज्या गावात पाण्याची समस्या असते त्या गावचे लोकं टँकर 3 ला येणार असेल तर इमानजदारीत लाईन लावून उभे राहतात. सकाळपासूनच ते आपली बादली रांगेत ठेवतात. पण गावातील जो दबंग असतो तो नियमांचं पालन नाही करत. तो 3 वाजताच येतो आणि इतरांची बादली बाजुला करुन स्वत:ची बादली लावतो.' असं उदाहरण देत मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली.