अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी विविध योजनांचं लोकार्पण करणार आहेत. आणंदच्या मोगरमध्ये चॉकलेट कंपनीचं मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. १९० कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय कोलकातामध्ये स्थापित होणाऱ्या डेअरी कंपनीचं ऑनलाईन भूमीपूजनही करण्यात येणार आहे.
कच्छमध्ये ६७ किमी लांब गॅस पाईपलाईनही मोदी करणार आहेत. यानंतर राजकोटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी संग्रहालयाचं उदघाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. महात्मा गांधी १८८७ साली इथल्याच शाळेतून दहावीची परीक्षा पास झाले होते.