पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना, ग्रामपंचायत प्रमुखांशी साधला संवाद

पंतप्रधान मोदींनी ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना केलं संबोधित 

Updated: Apr 24, 2020, 12:27 PM IST
पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना, ग्रामपंचायत प्रमुखांशी साधला संवाद title=

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना संकटाने आम्हाला नवा धडा मिळाला आहे की आता स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी गावकऱ्यांनी जगाला मोठा संदेश दिला. ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स नाही तर 'दो गज दुरी' असा संदेश दिला. ज्याने कमाल केली.

पीएम मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लाचे मोहम्मद इक्बाल यांच्याशी संवाद साधला. इकबाल म्हणाले की, त्यांनी कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनबद्दल गावातील प्रत्येक ब्लॉकला माहिती दिली, येथे फक्त एक रुग्ण आढळून आला. या दरम्यान, कर्नाटकमधील एका व्यक्तीशी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आजकाल ते गावच्या प्रमुखापासून ते देशांच्या प्रमुखांसोबत बोलत आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीने प्रत्येकाच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे, आता आपण समोरासमोर बोलू शकत नाही. पंचायती राज दिन ही स्वराज गावात आणण्याची संधी आहे, कोरोना संकटाच्या काळात त्याची गरज वाढली आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना संकटामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत, परंतु यामुळे आम्हाला एक संदेशही मिळाला. कोरोना संकटाने आम्हाला शिकवले की आता आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे, स्वावलंबी न होता अशा प्रकारच्या संकटांचा सामना करणे कठीण आहे. आज बदललेल्या परिस्थितीने आम्हाला स्वावलंबी होण्याची आठवण करून दिली आहे, त्यामध्ये ग्रामपंचायतींची मजबूत भूमिका आहे. यामुळे लोकशाही बळकट होईल.

स्वामित्व योजनेचा फायदा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, '5--6 वर्षांपूर्वी देशातील फक्त 100 ग्रामपंचायत ब्रॉडबँडने जोडल्या गेल्या, परंतु आज ही सुविधा सव्वालाख पंचायतपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान म्हणाले की, जी वेबसाइट सुरू केली गेली आहे, त्या माध्यमातून माहिती पोहोचविणे आणि गावात मदत करणे आणखी वेगवान होईल.'

पंतप्रधानांनी ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना म्हटलं की, 'आता ड्रोनद्वारे गावाचे मॅपिंग केले जाईल, तर बँकेकडून ऑनलाईन मदत होईल. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह 6 राज्यांपासून याची सुरुवात होत आहे. त्यानंतर ती प्रत्येक गावात नेली जाईल.'