PM Kisan Scheme Latest News: (India) भारतामध्ये बहुतांश लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेतीवर होतो. पण, प्रत्येक वेळी शेतीतून शेतकऱ्यांना नफा मिळतोच असं नाही. नैसर्गिक आपत्ती, अतीवृष्टी, दुष्काळ, किड- किकांचा प्रादुर्भाव या आणि अशा अनेक आव्हानांचा बळीराजाला सामना करावा लागतो. ज्यामुळं याचे थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर आणि जीवनशैलीवर होताना दिसतात. अशा या शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार सातत्यानं काही तरतुदी करताना दिसतं. यामध्ये आर्थिक तरतुदी तुलनेनं जास्त असतात. PM Kisan Scheme अर्थात पंतप्रधान किसान योजना ही त्यापैकीच एक.
PM Kisan Scheme अंतर्गत पीएम किसान सम्मान निधी (Pm kisan samman nidhi scheme) चा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुप्पट नफा होणार आहे. या योजनेच्या धर्तीवर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जात. होते. पण, आता मात्र ही रक्कम 4 हजारांवर पोहोचणार आहे.
सदर योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांचा प्राथमिक मदत निधी दिला जातो. हा निधी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पडताळणी प्रक्रिया काही अडचणींच्या कारणास्तव पूर्ण केली नव्हती. त्यामुळं त्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते. पण, आता मात्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, सरकार 14 व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये देणार आहे.
दरम्यान, पीएम किसान सम्मान निधीसाठीचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै या महिन्यांदरम्यान दिला जाणार आहे. यंदाच्या वर्षी 14 व्या हप्त्याची रक्कम निर्धारित कालावधीपेक्षा काही दिवस आधीच जमा केली जाणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेमध्ये दरम्यानच्या काळात बराच ढिसाळ कारभार पाहायला मिळाला होता. ज्यानंतर योजनेस अपात्र शेतकऱ्यांना या योजनेबाहेर काढण्यात आलं होतं. आता मात्र ही संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तूर्तास ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारतर्फे पैसे आलेले नाहीत त्यांनी 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवरून आपली तक्रार करावी.