नवी दिल्ली : 2019 लोकसभा निवडणुकीला अजून जरी वेळ असला तरी देखील सर्वच पक्षांची त्यांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. जशी-जशी निवडणूक जवळ येईल तसं राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात होईल. 2019 मध्ये पंतप्रधान कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपकडे पंतप्रधान मोदींचा चेहरा असला तरी विरोधकांचा चेहरा कोण याबाबत अजून संभ्रम आहे. काँग्रेसने जरी राहुल गांधी यांना काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्यास सुरुवात केली असली तरी देखील इतर विरोधी पक्षांच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणार नाही आहे. यातच आता काँग्रेसने जेडीएसला एक मोठा धक्का दिला आहे.
जेडीएसकडून करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे राहुल गांधी नक्कीच निराश झाले असतील. कर्नाटकमध्ये काँग्रेससोबत सत्तेत बसलेल्या जेडीएसने म्हटलं की, लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा व्हावी. पण जेडीएसचं वक्तव्य तेव्हा आलं आहे जेव्हा कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देतांना म्हटलं होतं की, जर त्यांचा पक्ष निवडणूक जिंकते तर ते पंतप्रधान होण्यासाठी तयार आहेत.
जेडीएसचे महासचिव दानिश अली यांनी म्हटलं की, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत निवडणुकीनंतर निर्णय व्हावा. यांनी याआधी झालेल्या पंतप्रधान निवडीची 3 उदाहरणं यावेळी समोर ठेवली. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस सत्तेत आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या खाते वाटपावरुन वाद सुरु आहेत. कर्नाटकात दोन्ही पक्ष किती दिवस सत्तेत राहतात हे पाहावं लागेल.