जाम बेक्कार क्रिएटीव्हिटी : रस्त्यावरच Plastic surgery;टीव्ही शोचं टॅलेंट पाहून डॉक्टरांनीही मारला कपाळावर हात

हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळेही पश्चाताप करतील

Updated: Nov 7, 2022, 03:16 PM IST
जाम बेक्कार क्रिएटीव्हिटी : रस्त्यावरच Plastic surgery;टीव्ही शोचं टॅलेंट पाहून डॉक्टरांनीही मारला कपाळावर हात title=

Viral Video : टिव्ही सीरियलमधील (tv shows) काही प्रसंग असे काही शूट केलेले असतात की ते सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होतात. मग ते कोणत्याही भाषेतील असोत लोकांना ते इतके सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. टीव्ही शोमध्ये क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली निर्माते अशा काही गोष्टी बनवतात, ज्या पाहिल्यानंतर लोकांचा आश्चर्याचे धक्के बसतात. सर्जनशीलतेच्या नावाखाली डेली सोपमध्ये (daily soap) कधी कधी काहीही खपवलं जातं. मात्र प्रेक्षकवर्ग मोठ्या असल्याने त्यावर काही उपाय नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका हिंदी टीव्ही शोची एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री पतंगावर लटकलेले दाखवले होते. अशातच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ज्यामध्ये, रस्त्याच्या मधोमध प्लास्टिक सर्जरी केली जात आहे. (Woman Performing Instant Plastic Surgery)

वाचून धक्का बसेल पण या टिव्ही शोमध्ये हे घडलंय. तामिळ टीव्ही शो रोजाने (Roja) या अव्वल क्रिएटिव्हिटीच्या (creativity) यादीत स्थान मिळवलं आहे. त्यांची कथा पाहून तुमचे डोळेही नक्कीच पश्चात्ताप करतील. झाले असे की,  एका महिलेला रस्त्याच्या मधोमध रुग्णवाहिकेतून उतरवताना दाखवण्यात आले. तिच्याभोवती सहा-सात लोक उभे आहेत. रस्त्याच्या मधोमध झोपलेल्या या महिलेसारखीच दिसणारी महिला तिच्याच बाजूला उभी असलेली दाखवण्यात आली आहे. यानंतर हुबेहुब दिसणारी महिला रस्त्यावर झोपलेल्या प्लास्टिक सर्जरी करते तेही एका मुखवट्याने. या लोकांनी तर प्लास्टिक सर्जरीची (Plastic Surgery) संकल्पनाच बदलून टाकली.

नेमकं काय घडलं होतं?

ही जखमी महिला दुसरी कोणी नसून टीव्ही शोची मुख्य नायिका होती, जिला गोळ्या घातल्या होत्या. त्यांना वाटले की नायिकेचा मृत्यू झाला आहे, म्हणून रस्त्याच्या मधोमध प्लास्टिक सर्जरी करून तिचा चेहरा बदलण्यात आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया येत आहेत. काही जण निर्मात्यांची खिल्ली उडवत आहेत तर काही म्हणत आहेत की हे पाहून सुश्रुत हे जग सोडून गेले असते. दरम्यान, हा व्हिडिओ आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.