कझाकिस्तान : कझाकिस्तानमध्ये विमानाला मोठा अपघात झाला आहे. अलमाटी विमानतळावर हा अपघात झाला आहे. टेक ऑफवेळी विमान दुमजली इमारतीला धडकून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमानात एकून १०० प्रवासी होते. त्यापैकी ७ जणांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु असून प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Plane with 100 people on board crashes in Kazakhstan, emergency services at the site - Almaty airport: Reuters pic.twitter.com/5F2q6jVD22
— ANI (@ANI) December 27, 2019
बेक एयर फ्लाइट २१०० चं स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे.