मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल करणार सादर!

केंद्रातील मोदी सरकारमध्ये आता रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 23, 2019, 11:01 PM IST
मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल करणार सादर! title=

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारमध्ये आता रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल सादर करणार आहेत. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पात मुंबईच्या वाट्याला काय मिळणार याचीच जास्त उत्सुकता आहे. तसेच महाराष्ट्राच्या वाट्याला नव्या रेल्वे गाड्या मिळणार का, याकडेही लक्ष असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. दरम्यान, अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसे वृत्त एएनआयने दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे. १ फेब्रुवारी रोजी यंदाचा वार्षिक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली अनुपस्थित राहिल्यास पीयुष गोयल हेच शेवटचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता आहे. 

दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. तेथे त्यांना अधिक वेळ राहावे लागणार आहे. त्यामुळे येत्या अंतरिम अर्थसंकल्पाला अरुण जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे.