SBI account block : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. तुमचं किंवा तुमच्या घरातील कुणाचं तरी SBI मध्ये बॅंक खातं असेलंच. म्हणूनच तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. SBI च्या नावाने एक मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा PAN नंबर बँकेसोबत अपडेट करण्यास सांगितलं जातं. मात्र, तुम्ही या मेसेजवर विश्वास ठेवून PAN क्रमांक अपडेट करायला जाल तर तुमचा घात होईल.
PIB ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. SBI च्या नावाने एक खोटा मेसेज व्हायरल होतो आहे. यामध्ये ग्राहकांना अकाऊंट ब्लॉक होण्यापासून रोखण्यासाठी तातडीने PAN अपडेट करण्यास सांगितलं गेलं आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं PIB ने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. यासारखा कोणताही मेसेज SBI कडून पाठवण्यात आला नसल्याचं PIB ने आपल्या फॅक्ट चेकमध्ये नमूद केलेलं आहे.
A #Fake message issued in the name of SBI is asking customers to update their PAN number to avoid their account from getting blocked#PIBFactCheck
Never respond to emails/SMS asking to share your personal or banking details
Report at
1930 pic.twitter.com/GiehqSrLcg
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 27, 2022
PIB च्या माहितीनुसार असा मेसेज ततुम्हालाही आला असल्यास याला कोणताही रिप्लाय करू नका असं सांगितलं गेलं आहे. तुमचे पर्सनल डिटेल्स किंवा बँकिंग डिटेल्स कुणासोबतची शेअर करू नका, असंही PIB ने आवाहन केलं आहे.
तुम्हालाही याबाबतचा मेसेज आला असेल तर तुम्ही फोन करून किंवा ई-मेलवरून याबाबतची थेट तक्रार नोंदवू शकतात. ई-मेलवरून तक्रार नोंदवण्यासाठी report.phishing@sbi.co.in यावर ई-मेल पाठवू शकतात. फोनवरून तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1930 वर फोन करू शकतात.
PIB fact Check on fake message issued in the name of SBI is asking customers to update their PAN number to avoid their account from getting blocked