Ram Mandir : पीएफआयच्या निशाण्यावर राम मंदिर?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आलीय.  

Updated: Oct 18, 2022, 11:34 PM IST
Ram Mandir : पीएफआयच्या निशाण्यावर राम मंदिर? title=

मुंबई : पीएफआयचा (PFI) अतिशय खतरनाक कट उघड झालाय. अयोध्येतलं राममंदिर (Ayodhya Ram Mandir) उडवून देण्याचा कट पीएफआयने आखल्याचं उघड झालंय. राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा डाव आखण्यात आलाय. पीएफआयच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय.  (pfi popular front of india ayodhya ram mandir see full report)

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या संघटनेला देशात केवळ दहशतवादी कारवायाच करायच्या नव्हत्या तर अयोध्येतलं राम मंदिरही त्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अयोध्येतील राम मंदिर पाडून त्याठिकाणी पुन्हा बाबरी मशीद उभारण्य़ाचा कट पीएफआयनं रचला होता. एटीएसच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत. 

PFIचा राममंदिर उडवण्याचा कट? 

'पीएफआयचं मॉडेल 2047' तपासात उघड. अयोध्येतलं राममंदिर उडवून देण्याचा पीएफआयचा प्लॅन आहे. राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा कट आहे. मुस्लीम राष्ट्र उभारण्यासाठी PFIला बाबरी मशीद उभारायची आहे.  PFI च्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानात असल्याचं समोर आलंय. देशात विघातक कारवाया करण्याचा पीएफआयचा कट होता. सामाजिक अशांतता, दंगलींचा पीएफआयचा कट उघड झालाय. 
 
तपास यंत्रणांनी नाशिक कोर्टात हजर केलेल्या संशयितांकडील कॉम्प्युटर, मोबाइल, हार्डडिस्क आणि बँकेच्या व्यवहारांची तपासणी केली. त्यात संशयितांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळून आला. त्याचा ऍडमिन पाकिस्तानातील असल्याचं उघड झालंय. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, यूएई, अफगाणिस्तान या देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवादविरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखीही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.