नवी दिल्ली : नोकरदारवर्गासाठी नियमानुसार, प्रत्येक कर्मचारी आणि कंपनीला पीएफ रक्कम ईपीएफओकडे जमा करावी लागते. प्रत्येक महिन्यास पगारातून कापली जाणारी रक्कम अनेकदा कर्मचारी रिटायर्ड होताना घेतात किंवा काहीजण महत्त्वाच्या कामासाठीदेखील पीएफची रक्कम काढतात. परंतु अनेकांना आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत याची माहिती नसते. विविध प्रकारांनी पीएफ बॅलेन्स चेक करता येतो. ऑनलाईनद्वारे, मिस कॉल आणि एसएमएसद्वारेही पीएफ बॅलेन्सविषयी माहिती घेता येऊ शकते.
- ईपीएफओने EPFO आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन पीएफ बॅलेन्स चेक करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी यूएएन क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
- UAN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर view passbook बटणवर क्लिक केल्यावर बॅलेन्स समजू शकेल.
- EPFO ऍपवर बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वात आधी मेंबरवर क्लिक करा. त्यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून पीएफ बॅलेन्स चेक करता येईल.
मिस कॉलद्वारेही पीएफ बॅलेन्सची माहिती मिळू शकते. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉल दिल्यानंतर AM-EPFOHO कडून एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये नाव, यूएएन क्रमांक, जन्मतारिख आणि तुमच्या पीएफ बॅलेन्सची माहिती येते. ऑनलाईन, ऍपपेक्षा मिस कॉलची सुविधा अतिशय सोपी असल्याने याला अनेकांची पसंतीही मिळते आहे.