Petrol Price : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पाहा आजचा दर

Petrol Price 24 March 2021 Update : देशात महागाईचा भडका उडाला आहे. असे असताना आता सर्वसामान्यांनासाठी थोडासा दिलासा देणारी बातमी. 

Updated: Mar 24, 2021, 09:25 AM IST
Petrol Price : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पाहा आजचा दर title=

मुंबई : Petrol Price 24 March 2021 Update : देशात महागाईचा भडका उडाला आहे. असे असताना आता सर्वसामान्यांनासाठी थोडासा दिलासा देणारी बातमी. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना देण्याबाबत सरकारी तेल कंपन्या विचार करत आहेत. गेले तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र येत्या एक ते दोन दिवसांत त्या कमी होण्याची शक्यता आहे. 

आज 24 मार्च आहे आणि आज पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. सर्वसामान्यांना या बदलामुळे दिलासा मिळाला आहे. 25 दिवसानंतर पेट्रोल डिझेलचे दर खाली आले आहेत. यंदाची ही पहिली घट आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 15 दिवसांत 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर वरून 64 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेल 16 पट महागले होते. तथापि, पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्याप विक्रमी उच्च पातळीवर आहेत.

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शेवटचा बदल 27 फेब्रुवारी 2021 रोजी झाला होता. जेव्हा दिल्लीत पेट्रोलच्या किंमती 24 पैशांनी वाढल्या आणि डिझेल 15 पैशांनी महागले. पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 25 दिवस स्थिर होते, आज पेट्रोल आणि डिझेलच्या कमी दरांमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये 17 पैसे प्रतिलिटर कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीतील पेट्रोलचा दर 91 रुपयांवर आला आहे. चेन्नईत पेट्रोल 93 रुपयांपर्यंत खाली आले आहे. तथापि, ही कपात असूनही, किंमती विक्रमी पातळीवर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.57 रुपये प्रति लीटर वरुन 97.40 रुपये झाला आहे.

पेट्रोलपेक्षा डिझेल दिल्लीत सर्वात महाग झाले होते.  डिझेल 81.94 रुपये प्रति लीटर होते तर पेट्रोलचा दर प्रति लीटर 80.43 रुपये इतका होता. दरम्यान, दोन राज्यात पेट्रोलने 101 रुपयांचा आकडा पार केला होता. फेब्रुवारीमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर 100 रुपयांचा आकडा ओलांडला होता. राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील पेट्रोल आज 19 पैशांनी स्वस्त झाले आहे आणि 101.65 रुपये झाले आहे, जे देशातील सर्वात महागडे आहे, तर डिझेल 17 पैशांनी कमी करुन 93.60 रुपये प्रति लिटर झाले आहे. मध्य प्रदेशच्या अनूपपूरमध्ये पेट्रोलही 101 रुपयांच्या पलीकडे आहे तर डिझेल प्रति लिटर 92 रुपयांवर विकले जात आहे.

4 मेट्रो शहरांत Petrol ची किंमत

शहर           कालचा दर     आजचा दर

दिल्ली            91. 17            90. 99

मुंबई             97.57             97.40

कोलकाता      91.35             91.18

चेन्नई             93.11            92.95