मुंबई : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडताना दिसतयात. काही दिवसातच पेट्रोल शंभरी करेल अशी चिन्ह दिसतायत. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत. पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलच्या दरात 31 पैशांची वाढ दिसून आलीये..
मुंबईमध्ये पेट्रोल 94.36 रुपये प्रति लीटर दराने मिळतंय तर डिझेल 84.94 रुपये लिटर आहे. परभणी शहरात पेट्रोलचे दर राज्यातील इतर शहरांपेक्षा सर्वाधीक आहेत. तिथे एका लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना तब्बल 96.48 रुपये मोजावे लागत आहेत..
पेट्रोलची दरवाढ अशीच सुरु राहील्यास लवकरच पेट्रोल शंभरी पार करेल अशी अवस्था आहे.. सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम सर्वस्तरावर दिसून येतो. भाजीपाला, अन्नधान्य नेआण करणाऱ्या गाड्यांनाही याचा फटका बसतोय. त्यामुळे भाजीपाल्यांच्या किंमतीवरही त्याचा परिणाम दिसून येतोय.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.