Petrol Diesel Price on 7 March 2023 : सणाच्या दिवसात महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. घसगुती वापराच्या गॅस दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 350 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीच्या घरात आहेत. देशात सरकारी तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वर खाली होत असतात. आज होळीचा सण आहे. आज इंधनदरात थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. आज मंगळवारी 7 मार्च 2023 रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह प्रति बॅरल 80.47 अमेरिकन डॉलरवर व्यापार करत आहे. त्याचवेळी, ब्रेंट क्रूड ऑइल 0.41 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 86.18 अमेरिकन डॉलरवर व्यापार करत आहे. या वाढीनंतरही आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होताना दिसत आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
देशात गॅस सिलिंडरात वाढ होत असताना काही शहरांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होताना दिसत आहे डेहराडून, नोएडा, जयपूर आणि लखनऊ येथे पेट्रोल आणि डिझेल दरात घट झालेली दिसून आली. आज डेहराडूनमध्ये पेट्रोल 32 पैसे स्वस्त आणि डिझेल 34 पैसे स्वस्त दराने 94.89 रुपये आणि 89.95 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
आज नोएडामध्ये पेट्रोल 31 पैसे आणि डिझेल 28 पैसे स्वस्त दराने 96.69 रुपये आणि 89.86 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 21 पैसे स्वस्त दराने 108.08 रुपये आणि 93.36 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. लखनऊमध्येही आज पेट्रोल 11 पैसे स्वस्त आणि डिझेल 10 पैशांनी 96.36 रुपये आणि 89.56 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गुरुग्रामध्ये पेट्रोल 21 पैसे आणि डिझेल 20 पैशांनी महागले आहे 97.10 रुपये आणि 89.96 रुपये प्रति लीटर.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर तपासण्यासाठी तुम्हाला फक्त एक SMS पाठवावा लागेल. देशातील बहुतांश सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. इंडियन इंडियन ऑइलचे ग्राहक त्यांच्या शहरातील इंधनाचे दर तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात. दुसरीकडे, बीपीसीएलचे ग्राहक आहेत, पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासण्यासाठी आरएसपी <डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात. HPCL ग्राहकांनी 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> पाठल्यानंतर तुम्हाला तर तात्काळ समजण्यास मदत होईल.