महागाईचा फटका... मुंबईत पहिल्यांदा पेट्रोलच्या दरात एवढी वाढ

वाचा 4 मेट्रो शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

Updated: Jun 27, 2021, 09:41 AM IST
महागाईचा फटका... मुंबईत पहिल्यांदा पेट्रोलच्या दरात एवढी वाढ  title=

मुंबई :  आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. सतत होत असलेल्या दर वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मुंबईतत पेट्रोलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.  सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फळं आणि भाज्यांमधील इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 
शहर                   आजचे दर        
दिल्ली                   98.46  
मुंबई                    104.56
कोलकाता              98.30
चेन्नई                     99.49

4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर 
शहर                आजचे दर 
दिल्ली                88.90
मुंबई                  96.42
कोलकाता           91.75
चेन्नई                  93.46

दररोज ६ वाजता दर प्रसिद्ध
 दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

आपण दर या प्रकारे तपासू शकता
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती होऊ शकते. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी 9224992249 वर लिहून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.