Petrol Diesel Price : ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today :  आज सुट्टीच्या दिवशी गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट आहे. काही शहरात पेट्रोल महागले तर काही शहरात पेट्रोल स्वस्त झाले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 9, 2023, 08:43 AM IST
Petrol Diesel Price :  ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर title=
Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price on 9 April 2023 : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशताच तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती बऱ्याच काळापासून बदलत आहेत. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. या वाढीनंतरही आज अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्याच वेळी, काही शहरांमध्ये किमतीत वाढ झाली असली तरी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. सध्या WTI क्रूड ऑइल 80.70 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $ 85.12 वर आहे.

वाचा: राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आज पेट्रोल 96.63 रुपये आणि 89.80 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल 14 पैशांनी महागले आहे. अमृतसरमध्ये पेट्रोल 11 पैसे स्वस्त आणि डिझेल 10 पैसे स्वस्त दराने 97.50 रुपये आणि 87.85 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. दिल्लीजवळ, एनसीआरचे नोएडा पेट्रोल 6 पैशांनी महागले आहे 96.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 6 पैशांनी महागले आहे 89.82 रुपये. लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैसे स्वस्त आणि डिझेल 14 पैसे स्वस्त दराने 96.47 रुपये आणि 89.66 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज जयपूरमध्ये पेट्रोल 19 पैसे स्वस्त आणि डिझेल 17 पैसे स्वस्त दराने 108.48 रुपये आणि 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

शहर    डीझेल   पेट्रोल
दिल्ली   89.62      96.72
मुंबई    94.27      106.31
कोलकाता       92.76      106.03
चेन्नई   94.24      102.63

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.