Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर

Petrol-Diesel Price:  बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...

Updated: Jan 23, 2023, 08:33 AM IST
Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर title=

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनुसार, आज म्हणजेच 23 जानेवारीलाही कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 

तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचे दर 89.62 रुपये आहे. त्याच वेळी, दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये आणि डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 96.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे.  

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

 

वाचा: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा 

 

या राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचे दर 84.10 रूपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तसेच गेल्या 24 तासांत कच्चा तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.