Petrol-Diesel च्या किमती जाहीर, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये अनेक चढ-उतार सुरु असतात. परिणामी पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ उतार दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत.

Updated: Aug 19, 2022, 08:53 AM IST
Petrol-Diesel च्या किमती जाहीर, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय? title=
Petrol-Diesel Price Today 19th August : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये अनेक चढ-उतार सुरु असतात. परिणामी पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ उतार दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जरी केले जातात. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत... 
 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ किंवा घट झालेली नाही.  जारी करण्यात आलेल्या नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
  
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
 
शहर - पेट्रोलच्या किमती - डिझेलच्या किमती
मुंबई - 106.25             -  94.22
पुणे - 105 - 92
नागपूर -106.03            -   92.58
नाशिक - 106.74 - 93.23
हिंगोली - 107.29         -  93.80
परभणी - 108.92 - 95.30
धुळे - 106.05           -  92.58 
नांदेड - 108.24          -  94.71
रायगड - 105.96          -  92.47
अकोला - 106.05         - 92.55
वर्धा - 106.56 - 93.10
नंदुरबार - 106.99        - 93.45
वाशिम - 106. 37        -   93.37
चंद्रपूर -106.14 - 92.70
सांगली - 105.96          -  92.54
जालना -107.76            -  94.22
 
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे पाहाल?
 
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.