Petrol-Diesel Price : अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Updated: Aug 2, 2021, 09:06 AM IST
Petrol-Diesel Price : अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनांच्या दरात सतत वाढ नोंदवण्यात येत होती. सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 107.83 रूपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलसाठी 97.87 रूपये मोजावं लागत आहे. 

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 
शहर                     आजचे दर 
दिल्ली                       101.84
मुंबई                         107.83
कोलकाता                 102.25
चेन्नई                        101.49

महत्त्वाचं म्हणजे सतत वाढणाऱ्या डिझेलच्या  दरात घट झाली आहे. डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत डिझेलसाठी 97.45 रूपये मोजावे लागत आहेत. 

4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर 
शहर                 आजचे दर 
दिल्ली                   89.87
मुंबई                    97.45
कोलकाता             93.02
चेन्नई                    94.39

देशात जवळपास 19 शहरांमध्ये पेट्रोलसाठी 100 रूपयांवर पैसे मोजावे लागत आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, जम्मू-कश्मीर यांचा समावेश आहे. तुम्हाला जर दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घ्यायचे असल्यास ते कसे मिळवावे हे जाणून घ्या.

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होत असतात, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत सकाळी 6 वाजता जाहीर केली जाते.  इंडियन ऑयल (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या शहराचा कोड सापडेल. मॅसेज पाठवल्यानंतर, तुम्हालाला पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत पाठविली जाईल. 

त्याचप्रमाणे BPCL ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP टाइप करून 9223112222  वर SMS पाठवू शकतात. तर  HPCL ग्राहक  9222201122 वर HPPrice लिहून SMS पाठवू शकता.