Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Petrol Diesel Price Today 20th April 2023 :देशाच्या राजधानीतही सध्या पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel Rates) दर हे स्थिरावलेले दिसत आहेत. दिल्लीत 96.72 रूपये प्रति लीटर पेट्रोलचे भाव आहेत तर 89.62 रूपये प्रति लीटर इतके भाव हे डिझेलचे आहेत. राज्यातही पेट्रोलचे भाव (Crude Oil Price) घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. 

Updated: Apr 20, 2023, 04:27 PM IST
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या काय आहेत आजचे दर title=

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्यापही फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी (Petrol Price Today in Mumbai) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुळात 1 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे फारसे बदललेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या आहे तशाच आहेत. त्याबद्दल अद्यापही बदल नाहीत त्यामुळे सध्या खाजगी वाहतूकीनं प्रवास करणाऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. आज 20 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर हे अनुक्रमे 106.31 प्रति लीटर आणि 94.27 प्रति लीटर इतके आहे. 

आज आंतरराष्ट्रीय बाजारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी(Crude Oil) घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या घसरतील अशी आशा काहींना वाटू लागली आहे. WTI वर क्रुड ऑईल म्हणजे कच्चा तेलाची किंमत ह 78.31 डॉलर प्रति बॅरल आहे काल हीच किंमत ही 81 डॉलर प्रति बॅरल इतकी होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे संकेत मिळत आहेत. (Petrol Diesel Price remains unchanges 20th april 2023 check price in your city)

तुमच्या शहरातील दर किती? 

देशाच्या राजधानीतही सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे स्थिरावलेले दिसत आहेत. दिल्लीत 96.72 रूपये प्रति लीटर पेट्रोलचे भाव आहेत तर 89.62 रूपये प्रति लीटर इतके भाव हे डिझेलचे आहेत. राज्यातही पेट्रोलचे भाव घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, कोल्हापूरमध्ये 106.75 प्रति लीटर पेट्रोलचे भाव आहेत. नांदेडमध्ये 108.64 प्रति लीटर इतके पेट्रोलच्या किमती आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल हे 106.25 रूपये प्रति लीटर इतकी किंमत आहे. तर पुण्यात पेट्रोल हे 106.63 प्रति लीटर आहे. पुण्यात पेट्रोलचे दर वाढलेले दिसत आहेत. सोलापूरला पेट्रोलचे दर हे 106.67 प्रति लीटर इतके आहेत. 

तुम्हाला जर का पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे पाहायचे असा प्रश्न सतावत असेल तर तुम्ही हे काम घरी बसूनही करू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक RSP व त्यांचा कोड टाईप करू शकता आणि 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. याद्वारे तुम्हाला योग्य ती माहिती मिळू शकते. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर एसएमएस पाठवूनही तुम्ही दर जाणून घेऊ शकता.