Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, येथे चेक करा नवे दर

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. गेल्या काही सत्रांपासून सातत्याने वाढत असलेली क्रूडच्या किंमतीत देखील किरकोळ बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 4, 2023, 08:54 AM IST
Petrol Diesel Price :  पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, येथे चेक करा नवे दर title=
Petrol Diesel Prices on 4th april 2023

Petrol Diesel Price Today on 4th April 2023 :  कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान मंगळवारी सकाळी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतीत बदल झाला. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. त्याचा परिणाम सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला आहे. यामध्ये यूपी, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये आज सकाळी तेलाच्या किमती बदल झाला आहे. 

आज जारी झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 23 पैशांनी स्वस्त होऊन 96.77 रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेल 20 पैशांनी घसरून 89.94 रुपये प्रति लिटर झाले. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले असून ते 96.57 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 10 पैशांनी वाढले आहे आणि 89.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 21 पैशांनी महाग झाले असून ते 97.10 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल 19 पैशांनी वाढून 89.96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

वाचा: म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा... 

तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या असून ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $84.96 पर्यंत वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $80.53 पर्यंत वाढला आहे.

चार महानगरामधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दर बदलले

  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.10 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • नोएडामध्ये पेट्रोल 96.77 रुपये आणि डिझेल 89.94 रुपये प्रति लिटर झाले आहे.
  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.