Petrol Diesel Price on 4th August : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत दरवाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल 85 डॉलरच्या वर आणि डब्लूटीआय क्रूड ऑइल प्रति बॅरल 80 डॉलरच्या वर विकले जात आहे. शुक्रवारी डब्लूटीआय (WTI) क्रूड ऑइलच्या दरात 0.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल 81.78 डॉलरच्या आसपास आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.21 टक्क्यांची वाढ नोंदवली असून ते प्रति बॅरल 85.32 डॉलरवर आहे. या दर वाढीनंतर भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) बदल झाला आहे.
जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीही पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरानुसार आजही दिल्ली, मुंबईसह देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या मंदावलेल्या किमतींना गती देण्यासाठी सौदी अरेबियाने या वर्षी जुलैपर्यंत तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करण्याची घोषणा केली होती. आता सप्टेंबर अखेरपर्यंत ही कपात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी प्रेस एजन्सीने ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याला सांगितले की, गरज भासल्यास, तेल उत्पादनातील या कपातीचे प्रमाण वाढवून ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते.
दरम्यान, याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती संपूर्ण देशात सारख्याच होत्या, पण राज्यांनुसार त्यांच्या किंमतींमध्ये फरक आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी सहा वाजता जारी केले जातात. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडून पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित केली जाते. त्यामुळे त्याची किंमत सहसा मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.