Petrol Price Hike : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Today Petrol Diesel Rate : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचदरम्यान काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार झाले. परिणामी आज कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले ते जाणून घेऊया...

Updated: Oct 25, 2022, 08:12 AM IST
Petrol Price Hike : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर title=

Petrol Diesel Price on 25 Oct 2022 :  दिवाळी (Diwali 2022) सण सुरू असताना सर्वसामन्यांना ऐन दिवाळीत महागाईच्या झळा सोसावे लागणार आहेत. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात बराच काळ दिलासा मिळत असला तरी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. (petrol diesel price hike in up today 25 october 2022)

काल (24 ऑक्टोबर) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार झाले. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांकडून दररोज इंधनाच्या किमतींचा आढावा घेतला जातो. आज कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel rate) दर वाढले ते जाणून घेऊया...

या राज्यात वाढले दर

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी देशातील सर्व महानगरांमध्ये दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसून, यूपीच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (petrol diesel price hike) वाढ झाली आहे. त्याचबरोबर बिहारमध्येही  पेट्रोलचे दर  स्थिर आहेत.

IOCL ने माहिती दिली

इंडियन ऑइलच्या अधिकृत (IOCl) वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज यूपीच्या (UP) गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) तेलाच्या किमतीत 31 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर पेट्रोलची किंमत 97 रुपये आणि डिझेलची किंमत 97 रुपये झाली असून 28 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटर झाले आहे.

वाचा : दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी घसरले? पाहा तुमच्या शहरातील किंमत

इथेही पेट्रोल-डिझेल महाग

याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 35 पैशांनी वाढून 96.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 33 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत 8 पैशांनी वाढून 96.44 रुपये आणि 89.64 रुपये प्रति लीटर झाली आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा-

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.