इंधन दरवाढीचा भडका! पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ

पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

Updated: Apr 2, 2022, 09:32 AM IST
इंधन दरवाढीचा भडका! पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा 80 पैशांनी वाढ झाली आहे. दरवाढीनंतर 2 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर मिळतंय.

12 दिवसांत 10 वेळा वाढल्या किमती

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 दिवसांमध्ये तब्बल 10 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोलचे दर 7.20 रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी 21 मार्च रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर होता.

आता तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत याची माहिती एसएमएसद्वारेही मिळू शकणार आहे. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. यासाठीचा कोड तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर सापडणार आहे.

CNG देखील महागलं

शुक्रवारी संध्याकाळीच IGL ने जाहीर केलं की, देशांतर्गत गॅल म्हणजेच PNG च्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. IGLने सांगितलं की, पाईपद्वारे स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या पीएनजीची किंमत प्रति एससीएम 5.85 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.