नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
इंडियन ऑईल कंपनीच्या वेबसाईटनुसार, पेट्रोलच्या दरात १५ पैशांनी कपात करण्यात आली आहे. तर, डिझेलच्या दरात १४ पैशांनी कपात करण्यात आली आहे. सलग १६ दिवस इंधन दरवाढ झाल्यानंतर ३० मे रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली.
सोमवारी पेट्रोलच्या दरात १५ पैशांनी कपात करण्यात आली आहे. यानंतर देशातील चार महानगरांपैकी दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.९६ रुपये प्रति लीटर, कोलकातामध्ये ८०.६० रुपये प्रति लीटर, मुंबईत ८५.७७ आणि चेन्नईत ८०.९४ रुपये झाला आहे.
डिझेलच्या दरात १४ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत डिझेलच दर ६८.९७ रुपये, कोलकातामध्ये ७१.५२ रुपये, मुंबईत ७३.४३ रुपये आणि चेन्नईत ७२.८२ रुपये प्रति लीटर झाला आहे.