Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल - डिझेलचे दर स्थिर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे कायमच लक्ष असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आकाश नेटके | Updated: Jul 31, 2023, 07:37 AM IST
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घरसण; मात्र पेट्रोल - डिझेलचे दर स्थिर title=
(फोटो सौजन्य - PTI)

Petrol Diesel Price 31 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 0.15 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल  80.43 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.09 डॉलर खाली येऊन प्रति बॅरल 84.90 डॉलर विकले जात आहे. दुसरीकडे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 440 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र आज काही राज्यांमध्ये इंधनाचे भाव किंचित कमी झाले आहेत तर बहुतेक राज्यांमध्ये दर स्थिर आहेत.

देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमध्ये विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 आहे. तर डिझेलची किंमत 98.24 रुपये आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये दुसरे सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. दुसरीकडे, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये आहे. तर छत्तीसगडमध्ये आज पेट्रोल 65 पैशांनी वाढून 103.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 63 पैशांची वाढ दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 69 पैशांनी तर डिझेल 65 पैशांनी महागलं आहे. पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचाही या यादीत समावेश आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार

आज अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे. बिहार, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर