Sister Save Her Brother Life: बहिण आणि भावाचं नात्याविषयी बोलावं तितकं कमी... जगातील सुंदर नातं असा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी भावाबहिणीच्या नात्याची गत... काहीही झालं तरी एका मुलाला भक्कम पाठिंबा मिळतो तो लाडक्या बहिणीकडूनच. त्याशिवाय भावाचे सर्व सिक्रेट फक्त बहिणीलाच माहिती असतात. सतत भांडणे भावाला भांडणारी बहिण वाईट परिस्थितीत भावाच्या पाठिशी ढाल बनून उभी असते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. हल्ली ट्रेंड बदललाय, भाऊ देखील बहिणीला राखी बांधतो.. बहिणींना स्वतःचं तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण कसं करावं हे माहित असतं. तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्हाला तुमची विचारसरणी बदलायला भाग पाडेल.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बहिणीच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. सध्या पावसाळा असल्याने अनेकजण धबधब्यावर जाताना दिसतात. अशातच आता एक परिवार सर्व सदस्यांसह एका धबधब्यावर गेलं होतं. त्यावेळी एका मुलगा धबधब्यावर खेळता खेळता पाण्यातून पाय सटकून पडला. त्यावेळी त्याची बहिण त्याच्या मदतीला धावून आली. बहिणीने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट भावाचा हात धरला आणि त्याला धरून थांबली आणि इतर सदस्यांना हाक मारत मदतीची मागणी केली. सर्वांनी मिळून भावा बहिणीला बाहेर काढलं.
दरम्यान, भावाला बाहेर काढेपर्यंत बहिणीने हात सोडला नाही. इतर लोक तिला पकडून बाहेर काढण्यासाठी येईपर्यंत बहीण हिंमत गमावत नाही. शेवटी बहिण तिच्या भावाला आणि स्वतःला वाचवण्यात यशस्वी होते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी बहिणीच्या धाडसाचं तोंडभरून कौतूक केलंय. रक्षाबंधन येतोय, तुम्हीही हा व्हिडिओ बहिणीला पाठवू शकता.