Petrol-Diesel Price: गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत खूप मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत 52 रुपयांनी वाढ झाली.यानंतर कच्चे तेल 6 हजार 945 रुपये प्रति बॅरल झाले आहे.जागतिक पातळीवर कच्चे तेल 83 ते 86 डॉलर प्रति बॅलर दरम्यान आहे. दरम्यान कंपन्यांकडून 13 जुलैचे प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. कच्चे तेल वाढले की पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरही परिणाम झालेला आपण पाहतो. दरम्यान कच्चे तेल अचानक इतक्या रुपयांनी का वाढले? यामागे काय कारणे आहेत? याचा पेट्रोल डिझेलवर कसा परिणाम झालाय? या बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जगभरातून पेट्रोल डिझेलच्या मागणीत वाढ होत आहे. यानंतर वायदा बाजारात शुक्रवारी कच्चा तेलाच्या किंमती 52 रुपयांनी वाढून 6 हजार 942 रुपये प्रति बॅरल झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाची किंमत जुलै महिन्यात डिलीव्हरी होणारा अनुबंध 52 रुपये तेजींसह वाढले. यानंतर 6.967 लॉटसाठी व्यवहार झाला. दिल्लीमध्ये पेट्रोल 94.02 रुपये प्रती लिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रति लीटरने मिळतंय. मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लीटर तर डिझेल 9.15 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 103.94 रुपये तर डिझेलचे दर 90.76 रुपये प्रति लीटर आहे.
बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय. जागितक स्तरावर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल 0.73 टक्के तेजीने 83.22 डॉलर प्रति बॅरल झाले. तर ब्रेंट क्रूडचे दर 0.59 टक्क्यांनी वाढून 85.90 डॉलर प्रति बॅरल व्यवहार करत होते.
15 मार्चला भारत सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात केली होती. यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर 2 रुपयांनी घटले होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कपात करण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती त्याच राहतात की त्याच वाढ होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जारी करतात. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या आपल्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जारी करतात. त्यामुळे घरबसल्या देखील तुम्हाला पेट्रोल डिझेलचे दर तपासता येतात.
तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती माहिती करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल मार्केटिंग कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. किंवा एक एसएमएस पाठवावा लागेल. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP सोबत शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवावा लागेल, तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना RSP लिहून 9223112222 नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल.
दिल्लीमध्ये पेट्रोल 94.02 रुपये प्रती लिटर तर डिझेल 87.62 रुपये प्रति लीटरने मिळतंय. मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लीटर तर डिझेल 9.15 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 103.94 रुपये तर डिझेलचे दर 90.76 रुपये प्रति लीटर आहे.