पेट्रोल आणि डिझेलची किंमत घटली, पाहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या पेट्रोल दराचा परीणाम इथे पाहायला मिळतो. 

Updated: Dec 8, 2018, 07:39 AM IST
पेट्रोल आणि डिझेलची किंमत घटली, पाहा आजचे दर  title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचे सत्र शनिवारीही कायम राहिले. मुंबईत आज पेट्रोल दर 76.28 रुपये प्रति लीटर तर डिझेल 68.32 रुपये प्रति लीटर आहे. सर्व पेट्रोल पंपांवरील हे दर सारखे आहेत. आज दिवसभर या दराने आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार आहे. उद्या सकाळी 6 वाजता या किंमतीत बदल झालेला दिसेल. पेट्रोल पंपांवर दररोज सकाळी 6 वाजता नव्या किमतींबद्दल माहिती दिली जाते. पेट्रोल पंपाच्या बोर्डवर किंमती डिस्प्ले केल्या जातात. यामुळे ग्राहकांना पेट्रोल खरेदी करणं सोपं जातं. 16 जुन पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या पेट्रोल दराचा परीणाम इथे पाहायला मिळतो.

दरात घट 

गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा दर 76.50 रुपये होता तर डिझेलचा दर 68.59 रुपये प्रति लीटर होता. त्यामुळे पेट्रोलमध्ये 22 पैशांनी तर डिझेलमध्ये 29 पैशांची घट आज पाहायला मिळतेय.

क्रूड तेलाचा परिणाम

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ही मोठी घसरण पाहायला मिळतेय.

जगामध्ये डब्ल्यूटीआय क्रूड आणि ब्रेंट क्रूड हे दोन प्रकारचे क्रूड उत्पादन होतं असतं.

आजच्या व्यवहारात सकाळी डब्ल्यूटीआय 52.38 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड 61.11 डॉलर प्रति बॅरल असा व्यवहार सुरू होता.